महिलांची तक्रार ऐकताच आमदार कोहळीकर यांनी तातडीने दखल घेत गावासाठी दोन टँकर मंजूर करून दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, गावात पाणी उपलब्ध असतानाही ग्रामसेवकाच्या निष्काळजीपणामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला संबंधित ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश काढण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
दुष्काळी परिस्थितीत गावात पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात असेल, तर अशा प्रकारचा हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतली.
या घटनेमुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
