बोधेगाव ग्रामपंचायतीवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप नागरिकांनी दाखवली विकासकामांची पोलखोल! वृक्षलागवड समाजमंदिरासह विविध कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून झालेला भ्रष्टाचार दाखवण्यात आला. कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे बॅनर इस्टिमेट यांची ठिकठिकाणी बॅनरबाजी गावामध्ये यावेळी दिसून आली

बोधेगाव ग्रामपंचायतीवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप नागरिकांनी दाखवली विकासकामांची पोलखोल!

वृक्षलागवड समाजमंदिरासह विविध कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून झालेला भ्रष्टाचार दाखवण्यात आला.

कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे बॅनर इस्टिमेट यांची ठिकठिकाणी बॅनरबाजी गावामध्ये यावेळी दिसून आली

यापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोरही केले होते आंदोलन

AC _बोधेगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून, गावातील काही नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या कथित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून पोलखोल केली. विविध विकासकामे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात त्यांची स्थिती काय आहे. हे नागरिकांनी संबंधित ठिकाणी जाऊन दाखवून दिले.

यावेळी कथित भ्रष्टाचाराचे बॅनर आणि त्याची उचललेली बिले यांचे गावामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले.

___

ठिकाण _ बोधेगाव (परळी)

प्रतिनिधी _ नितीन ढाकणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *