संविधान बचाओ रॅलीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाअध्यक्ष पंकज गुड्डेवार यांची उपस्थिती ठाणे पश्चिम येथे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा बुलंद आवाज!

ठाणे पश्चिम येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाओ रॅलीमध्ये गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. पंकज गुड्डेवार यांनी उपस्थिती दर्शविली.

भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि बंधुतेचा अधिकार दिला आहे. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे अबाधित राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.

संविधानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे तसेच लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी हर्षवर्धनदादा सपकाल प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी,,डॉ.श्रीवेला प्रसाद प्रभारी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी,, आमदार विश्वजीत कदम साहेब ,, खासदार प्रणिती ताई शिंदे ,,आमदार रामदासजी मसराम साहेब,, रजनीकांत मोटघरे जिलाध्यक्ष अनुसूचित जाति विभाग कांग्रेस कमेटी गड़चिरोली,,रूपेश टिकले परिवहन सेल जिल्हाअध्यक्ष ,नगरसेवक रमेश चौधरी, हेमंत मोहितकर ,,जेष्ठ नेते व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार व्यक्त केला. संविधानाचा सन्मान, लोकशाहीचे संरक्षण आणि सामाजिक समतेचा विचार जनमानसात रुजविण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

“संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा!” हा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
————————–
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *