बुलढाणा चीफ हेड भाऊसाहेब बावणे ६५ लाखांच्या कथित सौद्यातून आरक्षण हटविले? नांदुरा नगरपालिकेच्या ठरावावर कायदेशीर प्रश्न

नांदुरा नगरपालिकेत ६५ लाखांच्या कथित सौद्यावरून गट क्रमांक 74 शेत जमीन आरक्षण हटविण्याच्या निर्णयाची चर्चा चांगलीच रंगली आहे! सदर च्या जमिनीवर फ्लॉट टाकण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.नगर पालिकेच्या ठरावाला काही नगर सेवक आव्हान देणार असल्याचे समजले.
मुख्याधिकारी आणि जमीनमालक यांच्यात कथित ६५ लाखांच्या व्यवहारानंतर नगरपालिकेच्या सभेत आरक्षण हटविण्यासंदर्भात ठराव घेण्यात आल्याची चर्चा असून, या निर्णयाच्या कायदेशीर प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विकास आराखड्यातील आरक्षण हटविणे हा केवळ नगरपालिका ठरावाचा विषय आहे का? महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत आवश्यक प्रक्रिया, सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आणि सार्वजनिक हरकतींची प्रक्रिया पार पडली आहे का?
या निर्णयामागील कायदेशीर आधार, कथित व्यवहाराचे स्वरूप आणि ठरावाची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *