दिनांक १७/१०/२०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, धुळे तालुक्यातील अमळनेर फाट्या जवळील उड्डाणपुलाखाली अज्ञात आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील परोळा तालुक्यातील करमाड येथील ज्ञानेश्वर पीतांबर पाटील यांच्यावर हल्ला करून कापसाच्या विक्रीतून मिळालेली १०,७५,२५०/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची माहिती मिळताच, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांना निर्देश देण्यात आले. या शोध पथकाने गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांना ओळखण्यासाठी पारंपरिक तपास पद्धती, ज्ञात गुन्हेगारांची तपासणी,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तांत्रिक विश्लेषण तसेच आरोपींमधील इन्स्टाग्राम संभाषणांचे विश्लेषण व रेकॉर्डिंग यांसारख्या विविध पद्धतींचा उपयोग केला.
सीडीआर (CDR) मिळवून त्याचे विश्लेषण करण्यात आले. पुरावे एकत्र जुळवून आरोपींचा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आणि बागलाण येथे शोध घेण्यात आला आणि धुळे येथील दांडेवालाबाबा नगर मोहाडीचा रहिवासी असलेला संशयित, खुशाल उर्फ मन्या अशोक मोकळ (वय २५) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान, दांडेवालाबाबा नगर मोहाडीचे रहिवासी असलेले राधाकौर जरनेलसिंग सरदार (वय ५०), तलवारसिंग जरनेलसिंग सरदार (वय २८), रवींद्र वाघ, यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्य संगमताने गुन्ह्या केल्याची कबुली दिली. टोळीचा म्होरक्या खुशाल मोकळ आणि राधाकौर जरनेलसिंग सरदार यांना अटक करण्यात आली. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
३,४५,०००/- खुशाल मोकल,
२,९१,०००/ राधाकौर जरनेलसिंग सरदार यांच्या कडुन
एकूण ६,३६,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्याबाहेर आरोपी मनोज मोकळवर गुन्हे दाखल आहेत, या प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग असुन त्याने आई राधाकौर जरनेलसिंग सरदार यांच्या मदतीने चोरलेल्या पैशांची विल्हेवाट लावली होती. तपासात तोही दोषी आढळला आहे.पुढील तपास पो.नि.हेमंतकुमार भामरे करीत आहेत.
राजकुमार जैन शिरपूर (धुळे) ७८८७८७१७७१ व्हा ९४०३१७१७७१ शेतकऱ्याच्या कापूस विक्रीतील रोख रक्कम लुटल्याप्रकरणी आरोपीला अटक, ६,३६,००० रुपये रोकड जप्त.
