सोनाजी महाराजांचा रथोत्सव दहिहांडीला उसळला जनसागर ! अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा नगरीचे आराध्य दैवत संत सोनाजी महाराजांची यात्रा कार्तिकी पौर्णिमेपासून भरते.

दि. २४ नोव्हेंबरला रथाला तेल चढवून सजवण्यात आले. २५ तारखेला रात्री बारा वाजता दिंडी-पालखीसह रथोत्सवास सुरुवात झाली. २६ तारखेला नगर प्रदक्षिणेनंतर गोपाल काल्याचे कीर्तन व दहीहांडी संपन्न झाली.

सोनाबाबांच्या आवडत्या वरण-भाकरी, आंबाडीच्या भाजीच्या महाप्रसादाला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेत झुले, आकाश पाळणा, खेळणी व विविध दुकानांनी यात्रा भरगच्च भरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *