बीड जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून न्यायालय परिसरात तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय व पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय बीड या न्यायालयात सर्व ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू… स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या संपूर्ण टीम कडून सर्च ऑपरेशन सुरू
पोलिसांकडून नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत.
बीड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनाकडून युद्धपातळीवर तपासणी. प्रतिनिधी गणेश खरात (बीड)
