परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी एलसीबीच्या जाळ्यात जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदिप घोन्शीकर व अन्य कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. एक लाख 80 हजार रुपयांचं लाच प्रकरण. परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी ता.27
परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप गोपाळराव घोन्शीकर व त्याच विभागातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी शेख असलम शेख रज्जाक हे दोघे गुरुवारी रात्री लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले .

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोन्शीकर याच्याकडे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त सहायक आयुक्त या पदाचा पदभार आहे. तर त्याच्या नियंत्रणाखाली या विभागात जिंतूर येथील किशनराव वसेकर निवासी अस्थिवंग विद्यालयातील कलाशिक्षक शेख अस्लम शेख रज्जाक हा प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे.

या दोघांविरुद्ध एका 65 वर्षीय व्यक्तीने 17 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एक तक्रार दाखल केली की, त्यांच्या पत्नीने दि. 30/10/2024 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे माहे एप्रील 2021 ते ऑक्टोबर 2022 कालावधीतील 12,46,498/- रुपये थकीत वेतन मंजुर करण्यात आले. पण सदर थकीत वेतन अदा करण्यासाठी सहायक आयुक्त कार्यालयातील लिपीक शेख असलम यांने दि. 11/10/2026 रोजी तक्रारदार यांना थकीत वेतनाच्या 15 टक्के रक्कम त्यांना दिल्याशिवाय थकीत वेतन अदा करणार नाही असे म्हणून धमकावून लाचेची मागणी केली.
दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 11.57 वाजण्याच्या सुमारास मोबाईल कॉल व्दारे शेख असलम याची या विभागाने लाच मागणी पडताळणी केली असता, त्याने तक्रारदार यांच्याकडे थकीत वेतनाच्या 15 टक्के प्रमाणे 1,80,000/- रुपये लाच मागणी करून स्वतः स्विकारण्याची संमती दिल्याचे निष्पन्न झाले.तेव्हा
दि. 26/11/2026 रोजी परभणी बसस्थानक जवळील मीलन ऑप्टीकल समोर या विभागाच्या पथकाने
शेख असलम यांचे विरुद्ध सापळा कारवाई आजमावली असता, शेख असलम याने तक्रारदार यांचे पत्नीचे थकीत वेतनाची रक्कम अदा करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडून 1,80,000/- रुपये लाचेची रक्कम 15.12 वाजण्याच्या सुमारास स्वतः स्वीकारली.
पथकाने त्यावेळी त्यास लगेच रंगेहात पकडले. आरोपी लोकसेवक शेख असलम याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणले असता त्याने पंचासमक्ष सदर लाच रक्क़म त्यांचे वरीष्ठ़ डॉ. संदीप घोन्सीकर यांचेसाठी स्वीकारली असल्याचे सांगीतले. नंतर आरोपी शेख असलम यांने पंचासमक्ष डॉ. संदीप घोन्सीकर यांना मोबाईल व्दारे कॉल करुन 1,80,000/- रुपये रक्क़म स्वीकारल्याचे सांगुन पैसे कोठे घेवुन येवु असे विचारले असता, डॉ. घोन्सीकर याने रक्कम घराकडे घेवुन या असे सांगितल्याचे निष्पन्ऩ झाले. या विभागाच्या पथकाने तातडीने त्या आधारे डॉ.घोन्शीकर याला जिल्हा परिषद कार्यालयातून ताब्यात घेतले.झडती घेतली.
या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात आज सकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. या विभागाचे पोलीस उपाधीक्षक
किशोर तरोणे ,
सापळा पथकातील सदस्य सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, पोलीस शिपाई बोधनकर, पोलीस शिपाई नागरगोजे, पोलीस शिपाई घुले यांनी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *