४४ झाडे जप्त; ७३ किलो गांजा हस्तगत, ३७ लाखांचा मुद्देमाल !
अकोला जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार – नार्को स्ट्राईक अंतर्गत पिंजर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६/११/२०२६ रोजी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि गजानन राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, सावरखेड येथील शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आली आहे.
या माहितीवरून पोलिसांनी दोन पंच व राजपत्रित अधिकारी म्हणून नायब तहसीलदार यांच्यासह संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी शेतमालक देवराव काढनुजी अंभोरे (वय ५५, रा. सावरखेड, ता. बार्शीटाकळी) यांच्या शेतात ४४ गांजाची झाडे, वजन ७३ किलो ९५० ग्रॅम, अंदाजे किंमत ३७,४७,५०० रुपये असा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करून सीलबंद केला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंजर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ४७९/२०२६, NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक निलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन राठोड, पोउपनि अनिल इंगोले, सपोउपनि दिगंबर पवार, पोहेकॉ गजानन काळे, पोहेकॉ नागसेन वानखडे, पोकॉ अमोल देवकते, पोकॉ भागवत गंजवे, पोकॉ राजेंद्र सावळे, मपोकॉ मनीषा कांबळे, मपोकॉ वैष्णवी भांडे, चालक होमगार्ड सुरज गावंडे यांनी पार पाडली
