Ank – – –
अहिल्यानगर येथील बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिंडोरी प्रणित पार पडलेल्या तब्बल २७ हजार सामूहिक स्वामी-चरित्र पारायण सोहळ्याच्या अभिनव उपक्रमाचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला असून केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर काका लोळगे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी या केंद्राची स्थापना करण्यात आली होती , विनर्स बुक ऑफ इंडिया या संस्थेने या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद केली असून ‘विनर्स’चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉक्टर दीपक हारके यांच्या हस्ते या उपक्रमाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर लोळगे काका यांना जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या एका भव्य विशेष समारंभात प्रदान करण्यात आले.
जागतिक विक्रम करणारे अहिल्यानगर जिल्ह्याच्या बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरले असल्याचे भाविकांनी यावेळी स्पष्ट केले .
जयप्रकाश बागडे , अहिल्यानगर
