राजकुमार जैन शिरपूर (धुळे) ७८८७८७१७७१, व्हा ९४०३१७१७७१ धुळे येथे 37 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2026 चे आयोजन

दि.26/11/2026 ते दि.04/12/2026 या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर आयोजन करण्यात आले आहे

दि.26/11/2026 रोजी पोलीस मुख्यालय धुळे कवायत मैदानावर विशाल आनंद सिंगुरी, पोलीस अधीक्षक, धुळे यांचेहस्ते उदघाटन करण्यात आले.
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांची शारिरीक क्षमता व कार्यक्षमता वाढविणे, मानसिक ताणतणाव कमी करणे, नेतृत्वगुण विकसित करणे तसेच विविध जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यात परस्पर स्नेह, एकोपा आणि बंधुभाव वृध्दिगत करणे हा या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे.स्पर्धेसाठी उत्कृष्ट पंचांना आमंत्रित केले आहे तर समारोप समारंभ प्रसंगी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
स्पर्धेकरिता अंतिम निर्णय समितात
अध्यक्ष-संजय येनपुरे,(विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक). सचिव-विशाल आनंद सिंगुरी, (पोलीस अधीक्षक,धुळे)
सदस्य -चंद्रकांत गवळी,(पोलीस उप आयुक्त नाशिक शहर आयुक्त)श्रीकांत धिवरे,(पोलीस अधीक्षक,जळगाव)
मुमक्का सुदर्शन,(पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर)
श्रीमती अश्विनी सानप,(पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
डी.एस.स्वामी,(पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)
या स्पर्धेत धुळे,नाशिक शहर आयुक्तालय, जळगाव,अहिल्यानगर,नंदुरबार, नाशिक ग्रामीण च्या संघांनी भाग घेतला आहे.
खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा,निवास,भोजन, वाहतुक व वैद्यकीय सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत स्पर्धेत
धुळे जिल्हा पोलीस दलाने
21 सुवर्ण,12 रजत, कास्य 2,
नाशिक शहर आयुक्तालय पोलीस दल
2 सुवर्ण,5 रजत, 12 कांस्य,
जळगाव जिल्हा पोलीस दल 2 कास्य,
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल
5 सुवर्ण, 6 रजत,8 कांस्य,
नंदुरबार जिल्हा पोलीस दल 7 सुवर्ण,8 रजत,4 कांस्य
नाशिक ग्रामीण पोलीस दल 5 रजत,1 कास्य पदक प्राप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *