Ank – –
जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची भुजल पातळी वाढवण्यासाठी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश दहिफळे यांच्या संकल्पनेतुन आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांच्या श्रमदानातून
दुष्काळाचे संकट असल्याने जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे काम सध्या शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलतारा प्रकल्पाचे काम बालमटाकळीतून हाती घेऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला .
शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील शेतकरी गंगाधर सोनवणे व गरड यांच्या शेतामध्ये जलतारा प्रकल्प योजनेच्या माध्यमातून खड्डा खणून त्यामध्ये मुरूम टाकून पावसाचे पाणी शेती बाहेर जाणार नसून ते आपल्या तिच्या भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होत असल्याने या प्रकल्पाचा मूळ उद्देश असून जलतारा प्रकल्प जास्तीत जास्त तालुक्यात राबवण्यासाठी शेवगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश दहिफळे व पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने या प्रकल्पाचे काम अधिकाऱ्यांनी श्रमदानातून राबवण्याचे काम सुरू केले आहे ,
जलतारा प्रकल्पाचा उपयोग हा पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे .
यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे , व्यंकटेश मल्टीस्टेटचे संस्थापक आभिनाथ शिंदे ,रामनाथजी राजपुरे , चंद्रकांत गरड , कासमभाई शेख , अशोक खिळे , कृषी अधिकारी किरण पवार , कृषी विस्तार अधिकारी सचिन भाकरे , दादासाहेब शेळके , ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय घुगे , संघटना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आसाराम कपिले यांचे सह अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते .
जयप्रकाश बागडे
अहिल्यानगर , शेवगाव
