पैठण अविनाश गर्डे
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर, पैठणचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्कर कुलकर्णी यांना वेदमंगल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेचा ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. श्रीरंग देशपांडे, ॲड. सुधाकर कापरे आणि श्रीमती मंगल धुपे-गायकवाड यांच्या हस्ते भास्कर कुलकर्णी यांनी स्थानिक व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह श्री जुगलकिशोर लोहिया, श्री नंदकिशोर मालाणी, श्री विजय पापडीवाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थीहिताचे नावीन्यपूर्ण उपक्रम, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठीचे नियोजन आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची नेतृत्वक्षमता या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्य चाणक्य शैक्षणिक संकुलाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीपासून ते शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासापर्यंत त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे केवळ एका मुख्याध्यापकाचा गौरव नसून, शिक्षणासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या संपूर्ण आर्य चाणक्य परिवाराचा सन्मान आहे.
भास्कर कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, , कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे,उपाध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकूर, सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे,विद्यासभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी,संकुलाचे पालक उमेश जगताप,स्था. व्य.समिती अध्यक्ष डॉ. पद्मकुमारजी कासलीवाल, स्था. व्य. समिती कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, प्रा. शा. समिती अध्यक्ष शिवाजी मारवाडी, मा. शा. समिती अध्यक्ष नंदकिशोर मालाणी ,विजय चाटुपळे,डॉ. राम लोंढे, मनोज शुक्ल,किशोर भाकरे,विजय पापडीवाल,दत्तात्रय पोहेकर ,रविंद्र साळजोशी,मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती जोशी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.यासामवेत शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
