अँकर….. अहेरीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ!

अहेरीच्या खमनचेरू येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला.

या स्पर्धेत अहेरी प्रकल्पातील २७ शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील तब्बल ८२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल यासह विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले.

यावेळी ३२५ विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड करण्यात आली.

स्पर्धेत खमनचेरू केंद्राने प्रथम, मुलचेरा केंद्राने द्वितीय, तर जिमलगट्टा केंद्राने तृतीय क्रमांक पटकावला.

बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

तर अहेरीचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांनी आश्रमशाळेतील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

अहेरीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्वप्नांना आता राष्ट्रीय व्यासपीठाची नवी आशा मिळाली आहे.

आनंद दहागावकर!गडचिरोली….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *