दि. २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान गडचिरोली पोलीस कवायत मैदान, जिल्हा परिषद मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा रंगणार आहेत.
फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, क्रॉस-कंट्री आणि जलतरणासह तब्बल २० क्रीडा प्रकारांमध्ये पोलीस खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत.
मशाल प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी खेळाडूंचे स्वागत करत, या स्पर्धांमधून पोलीस दलात शिस्त, संघभावना, खेळाडूवृत्ती आणि परस्पर समन्वय वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश
“गडचिरोलीतील दहशतीचे वातावरण संपुष्टात आले असून, अधिकारी व अंमलदारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच खेळाडूवृत्ती, शिस्त आणि सांघिक भावना वाढवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.”
माओवादाच्या सावटातून क्रीडा मैदानापर्यंतचा गडचिरोलीचा हा प्रवास निश्चितच बदलत्या गडचिरोलीचे चित्र अधोरेखित करणारा ठरत आहे.
आनंद दहागावकर गडचिरोली.
