२,०२६ दिव्यांनी उजळला पैठणचा गणेश घाट! नगरसेवक ज्ञानेश्वर दहिवाळ मित्र परिवाराचा भव्य दीपोत्सव; किल्ले बनवा स्पर्धेत ग्रामीण भागातील दोन बहिणींची बाजी

पैठण | प्रतिनिधी अविनाश गर्डे

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, मांगल्याचा आणि संस्कृतीच्या जतनाचा उत्सव! याच उत्सवाचे औचित्य साधत नगरसेवक ज्ञानेश्वर दहिवाळ मित्र परिवाराच्या वतीने पैठण येथील ऐतिहासिक गणेश घाटावर तब्बल २,०२६ दिवे प्रज्वलित करून भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. असंख्य पणत्यांच्या प्रकाशाने गणेश घाटाचा परिसर उजळून निघाला. गोदाकाठच्या या दीपोत्सवाने दिवाळीच्या आनंदात अनोखी सांस्कृतिक पर्वणीच अनुभवायला मिळाली.

या भव्य दीपोत्सवाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक बंटी धुपे, शेखर शिंदे, जालिंदर अडसूळ, गणेश वरकड, शरद दहिवाळ, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, गोविंद जगताप, उपेंद्र मुद्दलवाडकर व अनमोल परदेशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

किल्ले बनवा स्पर्धेत ग्रामीण भागातील दोन बहिणींची चमकदार कामगिरी!

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ती किल्ले बनवा स्पर्धा! महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची आणि ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने आयोजित स्पर्धेत ग्रामीण भागातील दोन बहिणींनी प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

या प्रसंगी अतिष गायकवाड, गोपाल जगताप, राजेंद्र अमलेकर, रविंद्र दिवेकर, लक्ष्मीकांत पसारे, उपेंद्र मुद्दलवाडकर, विनोद लोहिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपोत्सवाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कृष्णा दहिवाळ, अर्जुन दहिवाळ, कुणाल तीळवणे, शुभम टेकाळे, भूषण जोमदे, रुद्र जोमदे, शुभम ठोंबरे व नाना निवारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *