वानटाकळी ग्रामपंचायतीत सत्तासंघर्ष! सरपंचांविरोधातील अविश्वास ठरावावर आज मतदान

AC _ परळी तालुक्यातील वानटाकळी येथे सरपंचांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे. विद्यमान सरपंचांविरोधात ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. त्यानुसार आज या ठरावावर निर्णय घेण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून, मतदारांनी नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या मतदान प्रक्रियेत अविश्वास ठराव मंजूर होतो की, विद्यमान सरपंच आपले पद कायम राखण्यात यशस्वी ठरतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. मतदानाचा निकाल काय? लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या बातमीचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट केला आहे बीड येथून आमचे प्रतिनिधी नितीन ढाकणे यांनी

___
ठिकाण _ परळी वैजनाथ

प्रतिनिधी नितीन ढाकणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *