नांदेड /हदगाव दीपक देशमुख हदगावमध्ये घरकुलाच्या पैशांसाठी दिव्यांग लाभार्थ्याची धावपळ! आईसह पंचायत समितीत मांडली व्यथा; गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशीचे निर्देश

हदगाव तालुक्यातील भानेगाव येथील दिव्यांग लाभार्थी बालाजी मारोती पावडे यांनी घरकुलाचे पैसे व ग्रामपंचायतीकडून मिळणारा दिव्यांग निधी मिळत नसल्याची तक्रार करत आईसह पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर आपली व्यथा मांडली. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिव्यांग लाभार्थ्याला आपल्या हक्काच्या लाभासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने पंचायत समितीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झाले.

दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक संपल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी लाभार्थ्याची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. तसेच विस्तार अधिकाऱ्यांना प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कुणी पैशांची मागणी केली असल्यास त्याचीही चौकशी केली जाईल आणि लाभार्थ्याची समस्या सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

बाईट : बालाजी मारोती पावडे, दिव्यांग लाभार्थी, भानेगाव.

बाईट : भागीरथाबाई मारोती पावडे.

बाईट: डि‌. के .आडेराघो गटविकास अधिकारी पंचायत समिती हदगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *