‘ज्ञानेश कुमार हटाव देश बचाओ’ दिल्ली आंदोलनाच्या समर्थनात परळीत जोरदार घोषणाबाजी !

AC _ निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी परळी येथील राणी लक्ष्मीबाई टावर परिसरामध्ये रविवारी निदर्शने करण्यात आली. दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी परळी वैजनाथ शहर व तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने हे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

​या निदर्शनांमध्ये परळी शहर आणि तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत दिल्ली येथील केंद्रीय आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

​यावेळी चाणक्य न्यूज इंडियाचे प्रतिनिधी नितीन यांच्याशी बोलताना मविआच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली.

____

नितीन ढाकणे
बीड (परळी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *