कन्नड “तांदूळवाडीत दिवाळी मध्ये शिधापत्रिका धारकांना माती, खडे मिश्रित गव्हाचे वाटप ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

मौजे तांदूळवाडी ( कन्नड) येथील रहिवासी राहुल गायकवाड यांना मिळत असलेल्या दुकान न. 199 येथून राशन वितरित होते, पण त्यांचे असे म्हणने आहे की हा राशन दुकानदार राशन वाटप फक्त 5 ते 6 दिवसच वाटप करतो, आणि नंतर तो बंद करून टाकतो जो वेळे वर हजर राहील त्यालाच तो धान्य वाटप करतो अन्यथा नाही.
आज दिनांक 31/10/2026 रोजी त्यांना असे माती आणि दगड मिश्रित गहु मिळाले आहेत.
चाणक्य न्यूज मराठी, आणि दैनिक सूर्यवार्ता च्या प्रतिनिधीशी श्री राहुल गायकवाड यांनी असे सांगितले की मी रीतसर तक्रार दिली असून सुद्धा या राशन दुकानदार वर कारवाई का होत नाही हे राशन दुकान अक्षरशः गाय गोठा असलेल्या ठिकाणी आहे तेथेच गाई म्हैस यांना खाऊ घालण्यात येणारी कुट्टी, कीटकनाशके, गिरणी, असे अनेक वस्तु पडलेल्या आहेत ज्या मुळे धोका निर्माण होऊ शकतो, सर्व केलेल्या चौकशी मध्ये हा दुकानदार दोषी आहे मग याच्या वर कारवाई का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तरी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *