बीडच्या लिंबागणेश मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!
प्रतिनिधी प्रतिनिधी गणेश खरात ( बीड)
शेतकरी आत्महत्याग्रस्त विषयी आ संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत कडक कारवाईची मागणी करण्यात आली. गणेश ढवळे यांच्यासह नागरिकांनी निषेध व्यक्त केला.
शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती असुन महाराष्ट्र राज्यात जानेवारी २०२२ ते जुन २०२६ दरम्यान १३,९२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मराठवाड्यात गेल्या ९ महिन्यात ७६० तर फक्त बीड जिल्ह्यात १७० शेतकरी आत्महत्यांची शासन दरबारी नोंद आहे.. सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कारण असताना सत्ताधारी शिवसेना ( शिंदे गट) पक्षाचे आ.संजय गायकवाड यांनी ” आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मयताला (अंत्यसंस्काराला) जाऊ नये, मृतदेह जनावरे खातील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल अशा प्रकारचे असंवेदनशील आणि संतापजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज दि.२९ गुरूवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.
