महाराष्ट्र पोलीस | पोलीस स्टेशन खदान, अकोला नवरात्र दरम्यान देवी मंडपातील साऊंड मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस, ३ आरोपी अटक; ३,४७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर
पोलीस स्टेशन खदान येथे फिर्यादी विलास आत्माराम पोफळे (वय ४१, रा. गजानन वाटिका, मलकापूर, अकोला) यांनी तक्रार दिली होती की, दि. १३/१०/२०२६ रोजी रात्री २.५० वा. च्या सुमारास नवरात्र उत्सवाच्या देवी मंडपाच्या मागील बाजूस ठेवलेली साऊंड सिस्टीम अज्ञात इसमाने चोरी केली.

चोरी गेलेला मुद्देमाल –
१) New Mark M6 कंपनीचे DJ मिक्सर
२) Suraj कंपनीचे Crosser
३) NX Audio कंपनीचे Rx 4000 मशीन – २ नग
४) एक अँड्रॉईड मोबाईल
एकूण किंमत – १,३७,५०० रुपये

यावरून पो.स्टे. खदान येथे गुन्हा क्र. १५७४/२०२६ कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पथकाने हद्दीतील CCTV फुटेज तपासून ३ आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींची नावे –
१) कृष्णा केशव इंगळे (वय २३, धंदा – ऑटो चालक, रा. क्रांतीनगर, शिवणी)
२) मनोज उर्फ मनीष शिवचरण इंगळे (वय ४५, धंदा – चालक, रा. तानाजी नगर, सिंधी कॅम्प)
३) गणेश दत्ता वाठोरे (वय २०, धंदा – ऑटो चालक, रा. क्रांतीनगर, शिवणी)
त्यांच्याकडून चोरी गेलेले संपूर्ण साऊंड सिस्टीम व मोबाईल (१,३७,५०० रु.) आणि गुन्ह्यात वापरलेला काळ्या-पिवळ्या रंगाचा महिंद्रा TREO कंपनीचा ऑटो क्र. MH-30 BC 5399 (किंमत २,१०,००० रु.) असा एकूण ३,४७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *