शेतकरी सचिन खेळकर यांच्या घराचे बँकेचे सील शिंदे शिवसेनेने तोडले ! बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथील घटना; बँकेने घराला लावलेले सील तोडल्याची माहिती समोर अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ निमकर्दा, ता. बाळापूर, जि. अकोला –

बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकरी सचिन खेळकर यांच्या घराला बँकेने लावलेले सील शिंदे गटाच्या शिवसेनेने तोडल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज थकवल्यामुळे बँकेने सचिन खेळकर यांच्या घरावर सील लावले होते. मात्र, शेतकऱ्याच्या घरावर सील लावणे चुकीचे असल्याचे सांगत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे सील तोडून घर खुले केले.
शेतकरी संकटात असताना बँकेने अशा प्रकारे घरावर सील लावणे अयोग्य असून, शेतकऱ्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बँक प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
य घरावरील बँकेचे सील शिंदे शिवसेनेकडून तोडले. कर्जामुळे बँकेने घर सील केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *