नांदेड / हदगाव अतुल राऊतराव

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज हिमायतनगर तालुक्याचा दौरा केला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी वाळकेवाडी व देरगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त भागाला भेट देत शेतकरी आणि नागरिकांशी थेट संवाद साधला.

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा आढावा यावेळी मंत्रिमहोदयांनी घेतला. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना यावेळी अन्नधान्याचे वाटपही करण्यात आले.

या दौऱ्याप्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने कोणती पावले उचलली जाणार, याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *