AC_ बोधेगाव ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि गावातील नागरिकांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी घडवून आणली. यावेळी संबंधित आरोपांचे खंडन करत गावातील विकासकामांची माहिती सादर करण्यात आली.
यामध्ये पाणंद रस्ते, शाळेची कामे, भूमिगत गटारे, समाजमंदिर, फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था तसेच ग्रामपंचायतीच्या अंतर्गत करण्यात आलेल्या इतर विविध विकासकामांचा समावेश होता. ही कामे प्रत्यक्ष दाखवत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली.
__
नितीन ढाकणे (बीड)
