दिनांक २६/१०/२०२६ ते दिनांक ३०/१०/२०२६ पर्यंत पोलीस मुख्यालय कवायत मैदान (कारंजा) गोंदिया येथे २५ वी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देवरी उपविभाग, आमगाव उपविभाग, तिरोडा उपविभाग, गोंदिया उपविभाग व पोलीस मुख्यालय गोंदिया असे ५ संघ होते. स्पर्धेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबडडी या सांघिक खेळाचा समोवश तसेच वैयक्तिक खेळामध्ये, ज्युडो, कुस्ती, व अथलेटीक्स ईत्यादी खेळांचा समावेश होता.
दिनांक २६/१०/२०२६ रोजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते गोंदिया जिल्हा पोलीस क्रीडा २०२६ कार्यक्रमाचे समारोप व बक्षीस वितरणाचे कार्यक्रम पार पाडण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक यांनी स्पर्धेत उपस्थितांना संबोधित करुन गोंदिया जिल्हा पोलीस दलातील खेळाडू पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे खेळातील प्राविण्य वृध्दींगत करण्यासाठी तसेच त्यांच्या खेळ गुणांना प्रोत्साहन व वाव मिळावा व त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. अतिशय खेळामेळीच्या वातावरणात जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा पार पाडलेल्या असुन या क्रीडा पार पाडण्यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान मोलाचे आहे. क्रीडा स्पर्धेत पुरुषामध्ये जनरल चॅम्पीयनशिप आमगाव उपविभाग संघ व महिलामध्ये पोलीस मुख्यालय गोंदिया संघ हे विजेते ठरल्याने सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करुन व खेळाडूंनी गडचिरोली येथे होणाऱ्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी व त्यानंतर राज्यस्तरावर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत भरघोस यश मिळवून गोंदिया जिल्हयाचे नाव उज्वल करावे असे सांगितले.
सदर कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प देवरी) श्री अभय डोंगरे, पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) श्री सुनिल दरेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री दिनेशचंद्र शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव श्री गजानन गुल्हाने, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री राजेश तटकरे, परि. पोलीस उप-अधीक्षक दिपम दहिवले, राखीव पोलीस निरीक्षक श्री राजेश सरोदे, राखीव पोलीस उप-निरीक्षक श्री दिपक शेंडे व जिल्यातील ठाणेदार तसेच इतर पोलीस अधीकारी/अंमलदार, लिपीक वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.
सरोज कवळे ब्युरो हेड गोंदिया

