नांदेड / हदगाव अतुल राऊतराव राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हिमायतनगर दौऱ्यादरम्यान एका तरुणाने १०२ रुग्णवाहिका सेवेच्या प्रश्नावर थेट आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नांदेड जिल्ह्यात १०२ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा दावा करत या तरुणाने आरोग्यमंत्र्यांसमोर अनोखे आव्हान मांडले.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हिमायतनगर दौऱ्यादरम्यान एका तरुणाने १०२ रुग्णवाहिका सेवेच्या प्रश्नावर थेट आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नांदेड जिल्ह्यात १०२ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा दावा करत या तरुणाने आरोग्यमंत्र्यांसमोर अनोखे आव्हान मांडले.

जिल्ह्यासाठी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करत, ही सेवा उपलब्ध करून दाखवा;
वर्षभर शर्ट घालणार नाही, असा निर्धार या तरुणाने व्यक्त केला. तरुणाने मांडलेला हा प्रश्न आणि त्याची अनोखी भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
१०२ रुग्णवाहिका सेवेचा मुद्दा थेट आरोग्यमंत्र्यांसमोर उपस्थित झाल्याने आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर संबंधित आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून या प्रश्नावर काय कार्यवाही करून घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तरुणाने उपस्थित केलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून आरोग्यसेवेशी निगडित महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आरोग्यमंत्री या विषयाची कितपत दखल घेतात आणि संबंधित विभागाला कोणते निर्देश देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *