AC _ पांगरी येथील ओंकार प्रा. लि. साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आजपर्यंतचा कारखान्याच्या वतीने चांगला ऊसभाव दिल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी यापूर्वी कारखान्याविरोधात आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत कारखान्याने विक्रमी भाव दिल्याने आपल्या लढ्याला यश आल्याची भावना कराड यांनी व्यक्त केली.
या निर्णयाबद्दल कारखाना प्रशासनाचे अभिनंदन करत बोत्रे-पाटील यांच्यासह व्यवस्थापकीय संचालकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही लढा सुरूच!
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कारखाना प्रशासनाने कायम सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष राहणार असून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही ठामपणे पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द फुलचंद कराड यांनी दिला.
___
बाईट _ फुलचंद कराड शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक
ठिकाण _ परळी वैजनाथ
प्रतिनिधी _ नितीन ढाकणे
