नांदेड/हदगाव दीपक देशमुख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा एल्गार; हदगाव तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा!दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हदगाव शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व नांदेड जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली
श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून निघालेली मोटारसायकल रॅली शहरातून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर धडकली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याची सरकारची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. , अशा शब्दांत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत आणि पीकविम्याची शंभर टक्के भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

बाईट: माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *