भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी क्षेत्रातील EKA Mobility कंपनीच्या सहा उत्पादन प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यास आपणास सस्नेह निमंत्रित करण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यास *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजपचे राष्ट्रीय संघटनात्मक पदाधिकारी बी. एल. संतोष* यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच *केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया* हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईकेए मोबिलिटी आपल्या उत्पादन क्षेत्रातील विस्ताराचा आणि भारताच्या मोबिलिटी उद्योगाच्या प्रगतीतील महत्त्वपूर्ण टप्प्याचा प्रारंभ करणार आहे.
या सोहळ्याचे वार्तांकन व प्रसिद्धी करण्यासाठी आपल्या माध्यम प्रतिनिधीने उपस्थित राहावे, ही विनंती.
*दिनांक : शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026*
स्थळ : जे डब्ल्यू मॅरियट, सेनापती बापट रोड, पुणे
वेळ : सायंकाळी 5.00 वाजल्यापासून
*महत्त्वाची सूचना :*
– सुरक्षा तपासणीसाठी सर्वांनी सायंकाळी 5.00 वाजेपुर्वी 15 मिनिटे आधी कार्यक्रम स्थळी पोहोचावे ही विनंती.
– कार्यक्रम तपशील
– – सायंकाळी ५.०० वाजता – पाहुण्यांचे आगमन व नोंदणी
सायंकाळी ५.१५ वाजता – इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदर्शन व उत्पादन क्षमतांची पाहणी
सायंकाळी ५.४५ वाजता – उद्घाटन समारंभासाठी आसनस्थ होण्याची विनंती
सायंकाळी ६.०० वाजता – स्वागत व उद्घाटनपर भाषण
सायंकाळी ६.१५ वाजता – उत्पादन प्रकल्पांचे आभासी उद्घाटन
सायंकाळी ७.१५ वाजता – आभार प्रदर्शन
सायंकाळी ७.३० वाजता – स्नेहभोजन
