तस्कारांकडून कमिशन घेवून वाळु व मुरुम तस्करी होत असलेबाबत….चळे येथील सर्कल संजय बाबुराव फिरमे हे कधीही त्यांच्या ऑफिसमध्ये वेळेवर हजर राहत नाहीतत्र शिवाय चळे येथे मुक्कामी राहत नाहीत. शासन निर्णय असूनही सर्कल हे सेवेच्या ठिकाणी राहत नाहीत व कर्तव्यात कसूर करीत आहेत. फक्त रायगड भवन येथे येवून तेथुन काम पाहत आहेत. वाळु व उपसा करणा-यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे चळे येथील ५ लाख ब्रॉस वाळु व १२ लाख ब्रॉस मुरुम बेकादेशीरपणे उचलला आहे. तो गायरान मधील मुरुम शासनाची फसवणुक करीत आहेत तलाठी व सर्कल हे चिरीमिरी घेवुन वाळू व मुरुम तस्कायां पाठीशी घालत आहेत. त्याचप्रमाणे तहसिलदार सचिन लंगोटे हे या सर्वांना पाठीशी घालत आहेत गावातील तलाठी, सर्कल कधीही कामावर लक्ष देत नाहीत हजर राहत नाहीत तसेच गावाला कोतवाल नाही तसेच पोलिस पाटील ही नाही. फक्त तलाठी व सर्कल हे रायगड भवन येथून काम पाहत आहेत. त्यामुळे वाळु माफिया व गुडाचा सुळसुळाट झाला आहे. वरिष्ठाचे यावर दुर्लक्ष आहे.
सदरहू सर्कल हे ध्वजरोहणानिमित्त हजर नसल्यामुळे कुर्दूवाडी येथे निलंबित केले होते तेथेही तो नेमलेल्या ठिकणी राहणेस नाही.
तरी वरीलप्रमाणे विचार करुन सर्कल संजय बाबुराव फिरमे व तलाठी पियुष भोसले यांना तात्काळ बडतर्फ करणेत यावे. वरील अर्जाप्रमाणे संबंधीत तलाठी व सर्कल यांचेवर ८ दिवसाचे आत कारवाई न झाल्यास मा. उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
