बारामती एग्रो यूनिट 2 येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागील काही दिवसांपासून ऊसाच्या भावावरून जो वाद चालू होता तो आज दिनांक 22 रोजी संपुष्टात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक 16 नोव्हेंबर रोजी जे गव्हान बंद आंदोलन चालू केले होते तेव्हा तहसीलदार सारिका भगत यांनी आंदोलक आणि कारखान्याच्या प्रशासनास जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून भाव द्यायचे असे ठरले असताना, आंदोलक आणि जिल्हाधिकारी यांच्या मध्ये चर्चा होऊन 100 रुपये वाढवून देण्यात यावा असा तोडगा निघाला त्यानुसार वैजापूर तालुक्यातील महालगाव या साखर कारखान्याने तब्बल 3,511 रुपये भाव जाहीर केला तसेच जिल्ह्यातील कारखान्याने ही भाव वाढवून दिला मात्र भाव वाढवून देण्यास बारामती एग्रो हा कारखाना तयार नव्हता. त्याच अनुषंगाने आज पाणपोई फाटा येथे रस्त्यावर बसुन आंदोलन सुरू केले होते.
हे आंदोलन सुरू असताना कन्नड च्या तहसीलदार आंदोलन स्थळी येऊन त्यांनी कारखान्याच्या प्रशासकीय अधिकारी मिलिंद देशमुख याना बोलावण्यात आले, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली पण आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नव्हते.
“अंबादास दानवे यांनी केली मध्यस्थी ”
आंदोलन स्थळी अंबादास दानवे यांचे आगमन झाले त्यांनी फोन वरून कारखान्याच्या संचालक मंडळाशी चर्चा करून त्यांना भाव वाढवून देण्यास भाग पाडले, त्या नुसार कारखाना प्रशासनाने 3,311. पहिली उचल देण्याचे पत्र आंदोलकांना दिले ,व उर्वरित 111 रुपये 15 दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील तसेच 70.30 च्या फ़ार्मूला नुसार दर देण्यास आम्ही बंधनकारक आहोत अशा आशयाचे पत्र आंदोलकांना देण्यात आले, आणि आंदोलन ची गोड सांगता करण्यात आली.
हे आंदोलन यशस्वी करण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब थोरात, कृष्णा साबळे, प्रकाश बोरसे,अमोल भाऊ आहेर पाटील, शुभम बारगळ. उभाठा चे अण्णा शिंदे, बाबासाहेब मोहिते, अशोक दापके,कृष्णा मोहिते आणि हजारो शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
