स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बार्शीटाकळी येथील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपी अटक; १,८१,०८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
दि. २७/१०/२०२६ रोजी फिर्यादी युग सौरभ कनोजिया (वय १९, रा. रामधन प्लॉट, रामदास पेठ, अकोला) हे सहकारी महिलेसोबत कुंभारी परिसरात फोटो-व्हिडिओ शूटिंगसाठी गेले होते. त्यावेळी महिलेच्या वाहनाच्या डिक्कीत ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या व कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण १,६८,०८१ रुपयांचा मुद्देमाल तीन अनोळखी इसमांनी चोरून नेला. फिर्यादीने पाठलाग केला असता आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला.

यावरून पो.स्टे. बार्शीटाकळी येथे गुन्हा क्र. ७०३/२०२६ कलम ३०३(२), ३५२, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

समांतर तपासातून टोळीचा पर्दाफाश

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना समांतर तपासाचे आदेश दिले.

स्था.गु.शा. पथकाने आरोपी पवन संजय वानखडे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींची नावे:
१) पवन संजय वानखडे
२) अविनाश अरुण करडे
३) करण दामोदर (रा. भीम नगर, डाबकी रोड)
४) मयुरी ब्रिगळ
५) तेजस्विनी भटकर (रा. संत कबीर नगर, अकोट फाईल)
आरोपींना पुढील तपासासाठी पो.स्टे. बार्शीटाकळीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन लेव्हरकर, सहा. पो.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. अनिल चव्हाण, अंमलदार महेंद्र मलीये, रविंद्र खंडारे, वसीमोद्दीन, खुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, मोहम्मद आमीर, उज्वला इंगळे, चालक विनोद ठाकरे, मनीष ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *