कन्नड “बारामती एग्रो साखर कारखान्याचे समोर भीषण अपघात ” एक ठार कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

बारामती एग्रो साखर कारखाना सुरू होऊन 15 दिवसच झाले त्या कारणाने कन्नड शहराकडे जाणारा रस्त्यावर वर्दळ असते, ट्रक, बैलगाड़ी, ट्रॅक्टर हे उसाने भरून याच मार्गे ये जा करतात.
याच कारखान्यासमोरून जात असतांना जिल्हा परिषद. शाळा खातखेड़ा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले भानुदास एकनाथ नागरे वय 53 वर्ष राहणार निंभोरा हे आपल्या मोटार सायकल वरून नातेवाईकां च्या अंत्यविधी साठी जात असतांना बारामती एग्रो कारखानाच्या गेट समोर एका बैलगाडीचा धक्का त्यांच्या मोटार सायकल ला लागल्यामुळे ते बाजूनेच जाणार्‍या ट्रक खाली जाऊन पडले त्यातच त्यांचा जागीच अंत झाला, त्यांना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी रुखसार खान यांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई वडील असा परिवार आहे, ही बातमी लिहीपर्यंत पोलिस स्टेशन कन्नड येथे कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *