नांदेड/ हदगाव अतुल राऊतराव हदगाव येथील संत रोहिदास सभागृहात वीर वडार एकता फाउंडेशनच्या वतीने वडार समाजाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी वडार समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा गोरे यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

बैठकीत नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी साहेबराव मेटकर, तर हदगाव तालुकाध्यक्षपदी साहेबराव देवकर यांची निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या विविध पदांवर अनेक कार्यकर्त्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बाईट: आमदार बाबुराव कदम कोहळीकर
बाईट: विजयदादा गोरे संस्थापक अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *