करंजखेड़ा ते साखरवेल फाटा हा रस्ता नागापूर ,घाटशेंद्रा ,नेवपुर,वाकी, आणि तसेच खान्देशातील पाचारो,जळगाव ला जोडणारा मार्ग, या रस्त्यावरून खान्देशातील अनेक व्यापारी आणि नागरिक सुद्धा ये जा करतात, पण या रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
अनेक ठिकाणी रस्ता एक एक फुटांपर्यंत उखडला गेला आहे, यामुळे वाहनधारकांना अक्षरशः कसरत करूनच रस्ता पार करावा लागतो काही ठिकाणी तर अगदी जीव मुठीत धरून खड्डा चुकवून रस्ता पार करावा लागतो.
या रस्त्यामुळे कन्नड शहर आणि पिशोर, खान्देशातील पाचोरा या गावाकडे जायला होणारा वेळ भरून निघणारा नाही .त्यांना होणारा त्रास शब्दात सांगता येणार नाही.
या रस्त्याची अवस्था पाहून संबंधित विभागाने या रस्त्या कडे तातडीने लक्ष्य द्यावे, व रस्त्याच्या दुरुस्ती चे काम तात्काळ चालू करून परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, असे न झाल्यास परिसरातील नागरिकां मध्ये जनजागृती करून मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज देशमुख यानी दिला आहे.
कन्नड “करंजखेड़ा ते साखरवेल फाटा रस्त्याचे काम तातडीने करा अन्यथा आंदोलन ” मनोज देशमुख कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
