अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांचे आंदोलन ! जलसमाधी घेण्याचा इशारा !

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याच्या प्रश्नावरून शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट पाण्यात बसून जोरदार आंदोलन केले.
साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांनी यावेळी जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला आहे.
आता तरी प्रशासन या प्रश्नाची दखल घेणार का? नागरिकांना दिलासा कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *