कन्नड “मुंडवाडीत प्रहार दिव्यांग संघटनेचा पुढाकार; दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी” – ‘दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी संघटनेचा एल्गार; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा’

कन्नड (प्रतिनिधी) : रायभान साळवे

मौजे मुंडवाडी येथे आज दिनांक 24 रोजी दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, त्यांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, या प्रमुख मागणीसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, आर्थिक सहाय्य, घरकुल योजना, दिव्यांग पेन्शन, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, शैक्षणिक सुविधा तसेच आवश्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

अनेक दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांची पुरेशी माहिती नसल्याने तसेच कागदपत्रे व प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणींमुळे योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर आयोजित करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारावेत व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

दिव्यांग बांधवांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांच्या हक्कांसाठी प्रहार दिव्यांग संघटना सातत्याने आवाज उठवणार असून, प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.

दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार असून, त्यांना शासनाच्या प्रत्येक पात्र योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.
यावेळी रामेश्वर घनकर खरेदी विक्री संचालक कन्नड (शिवसेना शिंदेगट) बापूसाहेब पंढरीनाथ बारगळ (सामाजिक कार्यकर्ते ) भगवान बारगळ (मा. चेअरमन मुंडवाडी )तसेच प्रहार संघटना पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष संजय मिसाळ, तालुका अध्यक्ष गणेश नलावडे, उपतालुका प्रमुख रामहरी घुगे, ता संपर्क प्रमुख गणेश रावते, शहर अध्यक्ष बाळू दळवी, सल्लागार बाळू खरे, कडू राठोड शरद मुरकुटे, ता सचिव कैलास पांचाळ,सौ. छायाबाई पवार महिला आघाडी,ज्ञानेश्वर मोरे, संदिप आर आळीगं,दिपक गवारे,काकासाहेब गवारे, उत्तम दांडगे, शंभू बारगळ, वैभव बारगळ, प्रज्वल बारगळ,अशोक शिंदे, सौ मीरा गुंजाळ, सौ. द्वारका गवारे तसेंच गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते स्वागत समारंभ करून जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिव्यांग व्यक्ती च्या पाठीशी ठाम पणे उभे आहोत भविष्यात दिव्यांग बांधावाना शासकीय योजनेपासून वंचित ठेवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *