नांदेड | अतुल राऊतराव श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेचा भव्य यात्रा महोत्सव; लाखो भाविकांची मांदियाळी

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणातून भाविकांची पदयात्रा; गुरुवर्यांचे आशीर्वचन आणि शासकीय महापूजा संपन्न

वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांचा भव्य यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून लाखो सद्भक्तांनी उपस्थिती लावत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले श्रीक्षेत्र कपिलधार हे वीरशैव लिंगायत समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. याच पवित्र भूमीत संत मन्मथ स्वामी महाराज यांनी तपश्चर्या केली आणि संजीवन समाधी घेतली. त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा ठेवा आजही भाविकांना प्रेरणा देतो.

कपिलधार यात्रेच्या परंपरेला राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आप्पांचे मोठे योगदान लाभले. त्यांनी या तीर्थक्षेत्राशी विशेष नाते जोडत पदयात्रा आणि धार्मिक परंपरेला व्यापक स्वरूप दिले.

यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही भाविकांचा उत्साह कायम होता. विविध भागांतून पदयात्रेने आलेल्या सद्भक्तांनी समाधीचे दर्शन घेत गुरुवर्यांचे आशीर्वचन श्रवण केले. यावेळी शासकीय महापूजाही संपन्न झाली.

यावेळी ष. ब्र. १०८ सद्गुरू सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, युवा संत राजशेखर गुरु स्वामी महाराज अहमदपूर, शिवलिंग शिवाचार्य महाराज शंभुलीकर नागापूर, सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव यांच्यासह विविध भागांतील असंख्य गुरुवर्यांची उपस्थिती लाभली.

भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक सोयी-सुविधांचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. तसेच मंदिर समितीच्या वतीनेही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सद्भक्तांच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसह दर्शनासाठी आलेल्या सर्व सद्भक्तांना ठिकठिकाणी अन्नदान व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे यात्रेत सेवा आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

बाईट १ – ष. ब्र. १०८ सद्गुरू सोमलिंग शिवाचार्य महाराज, बिचकुंदा

बाईट २ – युवा संत राजशेखर गुरु स्वामी महाराज, अहमदपूर

बाईट ३ – शिवलिंग शिवाचार्य महाराज शंभुलीकर, नागापूर

बाईट ४ – बाबासाहेब कोरे , कार्याध्यक्ष श्रीक्षेत्र कपिलधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *