धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे ‘व्हॉइस ऑफ मीडिया जर्नालिस्ट्स असोसिएशन’ची बैठक पार पडली. विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्य उपाध्यक्ष गणेश जैन आणि विभागीय संघटक संजय भामरे उपस्थित होते. शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पवार यांनी प्रास्ताविकाद्वारे संघटनेची भूमिका आणि उद्दिष्ट्ये सादर केली.
या वेळी महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, ज्यामुळे संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळाली. यामध्ये रवींद्र राजाराम पाटील यांची धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी,विभागीय उपाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, अॅडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात कायदेशीर सल्लागार,जितेंद्र सूर्यवंशी डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष,कविता भदाणे महिला विंग जिल्हा संघटक पदावर, तसेच तालुका स्तरावर भूषण पवार (शिंदखेडा), भिका चव्हाण (शिरपूर), अनिल वाघ (धुळे), राजेंद्र गवळी (साक्री) आणि सुभाष जगताप (साक्री ग्रामीण) यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर आणि संघटनेतील महिलांचा सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी राज्य उपाध्यक्ष गणेश जैन, विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंके, विभागीय संघटक संजय भामरे यांनी आपले विचार व्यक्त केले आणि उपस्थित पत्रकार सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गुरव यांनी केले आणि संजय महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपप्रसंगी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले आणि कोटा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
राजकुमार जैन शिरपूर (,धुळे) ७८८७८७१७७१ व्हा ९४०३१७१७७१ ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची जिल्हास्तरीय बैठक शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न
