हदगाव अतुल राऊतराव बरडशेवाळा बायपासवर स्विफ्ट डिझायर कारला अचानक आग; कार जळून खाक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर हदगांव वांरगा रोडवरील बरडशेवाळा बायपास परिसरात हदगांव शहरांतील उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ.दादासाहेब ढगे आपल्या पत्नी मुलासह नांदेड वरुन हदगांव कडे जात असताना रविवार 22 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 9 च्या दरम्यान त्याच्या स्विफ्ट डिझायर कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारने काही वेळातच पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
कारला अचानक आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हदगांव शहरांतील नगरपालिका अग्निशामक दलाने मदतीचा प्रयत्न केला असता प्रयत्न असफल ठरला.तोपर्यंत कार खाक झाली.या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने चालक मालक डाॅ.ढगे त्यांची पत्नी मुलगा बाहेर निघाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *